Posts

रेडिओ संवाद

आरटीओ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय

Image
आरटीओ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्र्यांनी कळ दाबून केली बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी पारदर्शक, मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक प्रतिनिधी संदिप इंगळे  मुंबई, दि. १८: परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या यावर्षापासून ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कळ दाबून बदलीपात्र अधिकाऱ्यांची संगणकीय यादी करण्यात आली. या यंत्रणेच्या माध्यमातून पूर्णत: पारदर्शकपणे आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.  दरम्यान, आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते १६६ मोटार वाहन निरीक्षक आणि ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्या बदलीची अंतिम यादी काढण्यात आली. १६६ मोटार वाहन निरिक्षकांपैकी ९१ टक्के जणांना तर ३१४ सहायक मोटार वाहन निरीक्षकांपैकी ९७ टक्के जणांना त्यांच्या पसंती क्रमानुसार बदली देण्यात आली

"गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण नसे जगी सन्मान, जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया. आजच्या खास दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"

Image
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः। गुरुसाक्षात परंब्रह्म, तस्मै श्रीगुरवेद नमः।। गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!" "गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण नसे जगी सन्मान, जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया. आजच्या खास दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!" गुरुपौर्णिमा ही एक परंपरा आहे जी सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना समर्पित आहे. हे गुरू उत्क्रांत किंवा प्रबुद्ध मानव मानले जातात जे कर्मयोगावर आधारित त्यांचे ज्ञान शिष्यांना देतात. गुरुपौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मीयांद्वारे साजरा केला जातो. गुरुपौर्णिमा ही पारंपारिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा किंवा नेत्यांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आषाढ (जून-जुलै) या हिंदू महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. महात्मा गांधी यांनी त्यांचे आध्यात्मिक गुरू श्रीमद राजचंद्र यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या उत्सवाचे पुनरुज्जीवन केले. याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात; कारण हा दिवस म्हणजे महाभारताचे लेखक आणि वेद संकलित करणारे

पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय!

Image
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय! स्रोत इंटरनेट    आषाढी वारी (पंढरपूर)  म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय.   वारकरी संप्रदाय  म्हणजे  पंढरपूर  येथील  विठ्ठलच्या  वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक तसेच मराठा, महार, लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात.   वारी हा एक आनंद सोहळा असतो.  वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच ना

सुपरहिट बॉलीवूड प्ले करणारे मूळ ट्रू डॉल्बी एचडी स्टीरिओ ऑनलाइन रेडिओ स्टेशन

Image
सुपरहिट बॉलीवूड प्ले करणारे मूळ ट्रू डॉल्बी एचडी स्टीरिओ ऑनलाइन रेडिओ स्टेशन हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील संगीत. कला, संस्कृती, साहित्य आणि संगीत या विविध क्षेत्रांशी संबंधित लोकांसाठी एक अद्भुत पर्याय. आमच्यासाठी वयाचा अजिबात बंधन नाही. आम्ही तुम्हाला भारतीय संस्कृतीची ओळख करून देतो जी आमचे मूळ आहे. आमच्या जुन्या परंपरा आणि संस्कृतीचा वारसा जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्यासाठी वयाचा अजिबात बंधन नाही. आम्ही तुम्हाला भारतीय संस्कृतीची ओळख करून देतो जी आमचे मूळ आहे. आपल्या जुन्या परंपरा आणि संस्कृतीचा वारसा जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. मनोरंजन, मुलाखती, जनजागृतीशी संबंधित विषयांवर चर्चा हा कार्यक्रमाचा भाग असेल. समाजाला दिशा देणे हा रेडिओ संवादचा मुख्य उद्देश आहे. 

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सूमधुर गाणी ट्रू डॉल्बी एचडी स्टीरिओ आता ऑनलाइन रेडिओ स्टेशन वर ऐका आपल्या..... रेडिओ संवाद .

Image
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सूमधुर गाणी ट्रू डॉल्बी एचडी स्टीरिओ आता ऑनलाइन रेडिओ स्टेशन वर ऐका आपल्या..... रेडिओ संवाद .  रेडिओ संवाद   Google Paly Store वर उपलब्ध  https://play.google.com/store/apps/details?id=radiosanvad.in  सुपरहिट बॉलीवूड प्ले करणारे मूळ ट्रू डॉल्बी एचडी स्टीरिओ ऑनलाइन रेडिओ स्टेशन हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील संगीत. कला, संस्कृती, साहित्य आणि संगीत या विविध क्षेत्रांशी संबंधित लोकांसाठी एक अद्भुत पर्याय. आमच्यासाठी वयाचा अजिबात बंधन नाही. आम्ही तुम्हाला भारतीय संस्कृतीची ओळख करून देतो जी आमचे मूळ आहे. आमच्या जुन्या परंपरा आणि संस्कृतीचा वारसा जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्यासाठी वयाचा अजिबात बंधन नाही. आम्ही तुम्हाला भारतीय संस्कृतीची ओळख करून देतो जी आमचे मूळ आहे. आपल्या जुन्या परंपरा आणि संस्कृतीचा वारसा जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. मनोरंजन, मुलाखती, जनजागृतीशी संबंधित विषयांवर चर्चा हा कार्यक्रमाचा भाग असेल. समाजाला दिशा देणे हा रेडिओ संवादचा मुख्य उद्देश आहे.  आपले विनम्र टीम  रे डिओ संवाद ई-मेल - radiosanvad@gmail.com